महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. मात्र, करोनामुळे यामध्ये बाधा आली. मात्र हा सोहळा महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान आज आषाढी एकादशी असून आजच्या दिवशी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदी यांनी सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थणा केली, नरेंद्र मोदी म्हणाले, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करुया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे”
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया.
वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2021