तिरुपतीला अर्पण केली पाच किलोची सोन्याची तलवार;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । कोणत्याही भक्तासाठी श्रद्धा असण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरीही. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात एका भक्ताने पाच किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण केली. या तलवारीची सध्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये सांगितली जात आहे.

ही तलवार तिरुमालाच्या तिरुपती बालाजी मंदिरात एका दाम्पत्याने दिली आहे. हैदराबादच्या एका दाम्पत्याने सोमवारी ही सोन्याची तलवार दिली आहे. या दाम्पत्याने रविवारी तिरुमाला येथील कलेक्टीव्ह गेस्ट हाऊसमध्येही माध्यमांसमोर सुमारे पाच किलो वजनाची तलवार देत असल्याचे सांगितले होते .  या दाम्पत्याला गेल्या एका वर्षापासून ही तलवार भेट देण्याची इच्छा होती पण करोनामुळे ते शक्य झाले नाही. शेवटी त्याला संधी मिळाली आणि या दाम्पत्याने सोमवारी सकाळी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) अधिकाऱ्यांना सोन्याची तलवार सुपूर्द केली

विशेष म्हणजे या तलवारीचे नाव ‘सूर्य कटारी’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तलवार या दाम्पत्याने तमिळनाडूच्या कोयंबटूरमधील तज्ञ ज्वेलर्सकडून बनवून घेतली आहे. ती तयार करण्यास सुमारे ६ महिने लागले. पाच किलो वजनाची ही तलवार दोन किलो सोने आणि तीन किलो चांदीने बनविली गेली आणि त्याची किंमत एक कोटी रुपये आहे.यापूर्वी, तामिळनाडूच्या तेनी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी थांगा दोराई यांनी २०१८ मध्ये भगवान वेंकटेश्वरला १.७५ कोटींची सोन्याची तलवार दान केली होती. सोन्याची तलवार किंवा ‘सूर्य कटारी’ तयार करण्यासाठी सुमारे सहा किलो सोन्याचा वापर केला गेला होता.श्री वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकुसरीचे एक अद्भुत उदाहरण आहे.
तिरुपती बालाजी श्री वेंकटेश्वर मंदिर हे देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात भगवान वेंकटेश्वर स्वामींना कोट्यावधी रुपयांये दान केले जातात. हे भारतातील दुसरे श्रीमंत मंदिर मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *