Scholarship Examination : 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । 10वीचा निकाल लागल्यानंतर आता 5वी आणि 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली या दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. (Scholarship examination for 5th and 8th class will be held on August 8)

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. सन 2020-21 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा!, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1417485227728019465?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *