महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy Rain) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं राज्यात पाऊस जोर धरणार आहे. रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी (Red alert for 5 district) मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागानं (Weather Today) म्हटलं आहे.
हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून त्यानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीच्या मुंबई केंद्राच्या म्हणण्यानुसार पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
Severe weather warnings issued by IMD today for #Maharashtra for 20-24 Jul,
Most of the impact as seen is concentrated over #Konkan an Madhya Maharashtra.
Watch for IMD updates pl@CMOMaharashtra @RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/djapsEjpFt— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 20, 2021
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजापूर शहरातील पूर ओसरला असून कोदवली नदी पुन्हा पूर्वपदावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. राजापूर कोदवली नदी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे राजापूर शहराला पुराचा विळखा पडला होता. बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. तब्बल सहा तास बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी होते. मात्र रात्री पावसाने मध्यरात्रीपासून थोडीशी उसंत घेतल्यामुळे राजापूर शहरातील पूर सरला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर आले आहेत. मात्र आज उद्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने पाऊस कोसळण्याची शक्यता कायम आहे.