अखेर दिवस ठरला निर्भया प्रकरणातील दोषींना आता 3 मार्चला फाशी होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – निर्भया खटल्यातील दोषींच्या नावे नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आला असून कोर्टाने चारही दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी सहा वाजता फासावर लटकवण्याचे आदेश जारी केले आहेत.या खटल्यातील दोषी कायद्यातील तरतुदींचा आधार घेत सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या फाशीला वारंवार उशीर होत आहे.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री 9 वाजता दिल्लीतल्या मुनारिकाजवळ चालत्या बसमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची क्रूर घटना घडली. या घटनेनं दिल्लीसह भारतभर पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही घटना चर्चेचा विषय ठरली.या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडितेला पुढे ‘निर्भया’ नाव देण्यात आलं. या निर्भयासाठी 16 डिसेंबरचा दिवस नरकयातनांचा होता.

झालं असं होतं की ,

पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली ‘निर्भया’ आणि तिचा इंजिनिअर मित्र दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमधून ‘लाईफ ऑफ पाय’ सिनेमा पाहून परतत होते.डिसेंबरच्या महिन्यात दिल्लीत खूप थंडी पडते आणि अंधारही लवकर पडतो. कुट्ट काळोखाला आणि बोचऱ्या थंडीला चिरफाडत रस्त्यांनी भरधाव धावणाऱ्या गाड्या वगळता, रस्त्याला कुणीच नव्हतं.निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचं होतं. दोघेही द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते.बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करयाला सुरूवात केली. त्यावेळी तिच्या मित्रानं पटकन हस्तक्षेप केला. मात्र, आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला.या सहा जणांनी बसमध्येच निर्भयावर बलात्कार केला. केवळ बलात्कार करून थांबले नाहीत, तर तिला अमानुष मारहाण केली आणि तिला गंभीररीत्या जखमी केलं. त्यातला एकाने गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगात घुसवली. या कृत्यामुळं निर्भयाच्या शरीरातील आतडी बाहेर आली. शरीरावरील अमाप आणि तीव्र जखमांनी मृत्यूशी झुंजणारी निर्भया रक्तानं माखली. त्यानंतर त्यांनी निर्भयासह तिच्या मित्राला नग्न केलं आणि वसंत विहारजवळ चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिलं. निर्भया रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या बाजूला निपचित पडली होती, तर तिचा मित्र प्राणांतिक आक्रोशानं मदतीची याचना करत विव्हळत होता.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *