महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आणि गेल्या वर्षी उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे सामान्य माणूस पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त दर देत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्यापासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली नसल्याचे बोलले जात आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 68 डॉलर आहे. भारत आपल्या क्रूड तेलापैकी 85 टक्के तेल आयात करतो. हेच कारण आहे की, स्थानिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील चढउतार केवळ आंतरराष्ट्रीय बाजाराच्या आधारेच दिसतात.
गेल्या अडीच महिन्यांत पेट्रोलच्या किमतीत सुमारे 11 रुपयांची वाढ झाली आहे. देशातील 17 राज्यांत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 किंवा त्याहून अधिक झालीय. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, पुडुचेरी, दिल्ली आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. भोपाळ ही कोणत्याही राज्यातील पहिली राजधानी होती, जिथे पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली होती.
देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशमधील अनुपपूर येथे विकले जात आहेत. गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.21 रुपये आहे तर डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज अनुपपूरमध्ये पेट्रोलची किंमत 112.78 रुपये आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 101.15 रुपये आहे.
पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त होऊ शकते?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली येणाऱ्या काळात आता पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळतील, असा विश्वास आहे. टीव्ही 9 बोलताना केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, क्रूड तेलाची किंमत खाली येत आहे, परंतु डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये कमकुवतपणा आहे. इंधनाच्या किमतींच्या बाबतीत सामान्य माणसासाठी हे फायद्याचे नाही. केडिया म्हणाले की, स्वस्त कच्च्या तेलामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. जवळपास समान कट डिझेलच्या किमतींमध्येही दिसून येतो. ते तेल उत्पादक देशांच्या निर्णयावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. सरकार अबकारी शुल्क कमी करण्याच्या बाजूने नाही, असे मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे.
भारताच्या शेजारच्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेल भारतापेक्षा शेजारच्या देशांमध्ये स्वस्त दराने विकले जात आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 118 पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात 54 रुपये) आहे. येथे डिझेलची किंमतही 116 पाकिस्तानी रुपये (53.81 रुपये) आहे. बांगलादेशातही एक लिटर पेट्रोलची किंमत 89 बांगलादेशी टका (78.34 रुपये) आणि डिझेलची किंमत 65 बांगलादेशी टका(68.83 रुपये) आहे. अफगाणिस्तानमध्येही प्रतिलिटर पेट्रोलची किंमत 57 अफगाण अफगाणी (भारतीय चलनात 53.49 रुपये) आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 184 श्रीलंकेचे रुपया (68.83 रुपये) आणि डिझेलची किंमत 111 श्रीलंकेचे रुपये (41.52 रुपये) प्रतिलिटर आहे.