पुण्यातील घटना ; नोकरीच्या आमिषाने उच्चशिक्षित महिलांना 6 लाखांचा गंडा,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । सोशल मीडियावर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याच प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषतः पोलिसांच्या आवाहनाकडे कानाडोळा करून अनेकजणांकडून बतावणीला बळी पडण्याचे प्रकार कायम आहे. असाच प्रकार पुण्यात घडला असून नोकरीच्या आमिषाने दोन उच्चशिक्षित महिलांना 6 लाखांचा गंडा घातला गेला आहे. याबाबत वाघोली परिसरातील एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. त्यांना बड्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी नोकरीविषयक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही रक्कम महिलेला बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. महिलेकडे वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करून महिलेला बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगून महिलेची एकूण मिळून 4 लाख 51 हजार 504 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *