करोना वायरस भारतात पसरण्याची शक्यता किती?

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबई : चीन कोरोना व्हायरसने ग्रासला गेला आहे. भारत आणि चीनमध्ये फक्त एका सीमेचं अंतर आहे. कोरोना व्हायरसने प्रभावित असलेल्या जागेपासून भारत 2 हजार किमी आहे. भारत कोरोना व्हायरसच्या अगदी जवळ असल्याचं म्हटलं जातंय. आता प्रश्न असा उभा राहतोय की, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची किती संभावना आहे.
भारतात कोरोना व्हायरसचे 3 रूग्ण होते. तिन्ही रूग्ण हे चीनमधून आले होते. 3 रूग्णांपैकी 2 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या एका रूग्णावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लवकरच डिस्चार्ज दिला जाईल.
मीडिया रिपोर्टनुसार, चीनसह इतर देशांमध्ये मिळून व्हायरसमुळे 1700हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विश्वात कोरोना व्हायरस झालेल्या रूग्णांची संख्या 70 हजारहून अधिक आहे. चीनमध्ये लागण झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे.
भारतात सर्वाधिक लोकं ज्या ठिकाणी राहतात तेथील तापमान हे 20 ते 30 डिग्री सेल्सिअस जवळपास आहे. भारतीय तज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी वातावरण आणि ऋतू सर्वाधिक महत्वाचं असणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनची वर्तमान स्थिती काही योग्य नाही. कोरोना व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. यामुळे चीन सरकार अनेक प्रकारे मदत करण्यासाठी सज्ज झालं आहे.
कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी स्वच्छता सर्वाधिक महत्वाची आहे. तसेच खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं महत्वाचं आहे. जे लोकं परदेशातून परतत आहेत त्यांनी सरकारला आणि आरोग्य विभागाला आपल्या येण्याची माहिती देणं बंधनकारक आहे.

भारतात कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता किती?
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिकदृष्ट्या भारत-चीन एकमेकांशी जोडले गेले आहेत. यामुळे हा संसर्ग पोहोचण्याची शक्यता सर्वाधिक आहे. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग हा 4 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमानात अधिक प्रमाणात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *