Tokyo Olympics : टोकयो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवची दमदार कामगिरी, पदकाची आशा कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) शनिवारी तिरंदाजांनी पदकाची आशा जिवंत ठेवली आहेत. महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव (Praveen Jadhav)आणि दीपिका कुमारी (Deepika Kumari) या जोडीनं मिश्र गटातील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. खराब सुरुवातीनंतर पुनरागमन करत या जोडीनं पुढील फेरीत प्रवेश केला. तर महिलांच्या 10 मीटर रायफल इव्हेंटमध्ये भारतीय जोडी स्पर्धेतून आऊट झाली आहे.

तैवानच्या चिया एन लिन आणि चिह चून तांग यांच्या विरुद्ध प्रवीण-दीपिका जोडीची लढत होती. तैवानच्या जोडीनं पहिला सेट 36-35 नं जिंकला. त्यामुळे त्यांना दोन पॉईंट मिळाले. दुसरा सेट 38-38 नं बरोबरीत सुटला. दुसऱ्या सेटनंतर तैवानकडं 3-1 अशी आघाडी होती. त्यामुळे भारतीय जोडीसमोर खडतर आव्हान होते.

प्रवीण-दीपिका जोडीनं तिसरा सेट 40-35 नं जिंकत ही सामना 3-3 नं बरोबरीत आणला. चौथ्या आणि शेवटच्या सेटमध्ये भारतीय जोडीनं दमदार प्रदर्शन करत 37-36 असा विजय मिळवला. हा सेट जिंकताच भारतानं हा सामना 5-3 नं जिंकला. यापूर्वी दीपिका आणि अतनू दास ही जोडी एकत्र खेळणार होती. मात्र रँकींग राऊंडमध्ये प्रवीणनं चांगली कामगिरी केल्यानं ही जोडी एकत्र खेळत आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये त्यांची लढत दक्षिण कोरिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजयी जोडीशी होणार आहे.

शूटींगमध्ये निराशा

शूटींगमध्ये भारताची सुरूवात खराब झाली. इलोवेनिल वालारिन आणि अपूर्वी चंदेला ही जोडी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली. इलावेनिल 626.5 पॉईंट्ससह 16 व्या तर चंदेला 621.9 पॉईंट्ससह 36 व्या क्रमांकावर राहिली. पहिल्या आठ शूटर्सनी पुढील फेरीत प्रवेश केला. नॉर्वेच्या डुएस्टाज जेनेट हेगनं 632.9 पॉईंट् मिळवत ऑलिम्पिक रेकॉर्डसह पहिला क्रमांक मिळवला. कोरियाची की पार्क हीमून (631.7) दुसरा तर अमेरिकेची मेरी टकरनं (631.4) पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *