सरकारी नोकरी : केंद्रीय विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती ; लवकर करा अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनुभवी उमेदवारांची तसंच नुकतंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात असलेल्या नवोदित उमेदवारांची संख्याही मोठी आहे. मोठ्या संख्येनं पात्र उमेदवार योग्य नोकरीच्या शोधात आहेत. स्थैर्याच्या दृष्टीनं शासकीय नोकरीला अनेकांचे प्राधान्य असते. शिक्षण क्षेत्राशी संबधित शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक उत्तम संधी सध्या उपलब्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये (Kendriya Vidylaya) सध्या मोठ्या प्रमाणात पदभरती (Recruitment) सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अगदी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठीदेखील यात काही जागांवर भरती होणार आहे.

2021-22 वर्षासाठी केंद्रीय विद्यालयात अर्धवेळ (Part Time) तसंच कंत्राटी तत्वावर (Contract Basis) कर्मचारी भरती सुरू होणार असून, याबाबतची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालयाने या अधिसूचनेद्वारे पीआरटी, टीजीटी, पीजीटी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवारांनी केंद्रीय विद्यालयाच्या https://kvsangathan.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करायचे आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड होणार आहे.

पीजीटी सर्व विषय : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयात बी. एड अनिवार्य

टीजीटी सर्व विषय : संबंधित विषयात एकूण 50 टक्के गुणांसह पदवी तसंच संबंधित विषयात बी.एड. अनिवार्य.

पीआरटी : किमान 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि 2 वर्षांचा जेबीटी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक तसंच बीईआयएड किंवा बी.एडची पदवी अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख : केंद्रीय विद्यालयाच्या https://kvsangathan.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसारित करण्यात आली असून त्यामध्ये अर्ज करण्याच्या आणि मुलाखतीच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अधिसूचना वाचून उमेदवार याबाबत माहिती घेऊ शकतात. शाळांच्या नियामांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज घेतले जातील. वेबसाइटवरून उमेदवार सर्व माहिती तपासून घेऊ शकतील.

या पदभरतीमुळे शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या आणि नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता असलेले आणि शालेय शिक्षण क्षेत्रातील इतर कामाची तयारी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तेव्हा ताबडतोब या वेबसाइटला भेट द्या आणि योग्य पदासाठी अर्ज करून शासकीय नोकरी मिळवण्याच्या संधीचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *