मुसळधार पावसाचा कहर ; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट ; चिपळूणमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 1 जूनपासून राज्यात पावसाचे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (136 deaths due to rains in Maharashtra; Red alert in 6 districts)

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा 70पर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर साताऱ्यात मिरगावात दरड कोसळून 12 ठार, आंबेघरमध्ये 17 जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. रत्नागिरीत जिल्ह्यातील पोसरेत 4 जण ठार, तर 13 जण बेपत्ता झाले आहेत. तर चिपळूणमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

महाडपाठोपाठ रत्नागिरीत जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. पोसर गावात दरड कोसळून १७ जण गाडले गेले आहेत. यातल्या 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. तर डिघा-याखाली अडकलेल्या १३ जणांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पोसरे खुर्दच्या बौद्धवाडीत काल रात्री १८ घरांवर डोंगर खचून दरड कोसळली. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आधीच पावसाने तडाखा बसलेल्या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे राज्यातील लोकांना पावसापासून काहीसा दिलासा मिळालेला दिसत नाही. आयएमडीने ‘मुसळधार पावसाचा’ अंदाज वर्तविला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. किनारी भागातील कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पुढील 24 तास रेड अलर्ट बजाविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *