पेट्रोल-डिझेलचा भाव ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । कच्च्या तेलाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यावर ओपेक देशांनी सहमती दर्शवल्यानंतर आठवडाभर त्याचे पडसाद जागतिक कमाॅडिटी बाजारावर उमटले. कच्च्या तेलाचा भाव ६८ ते ७५ डाॅलर दरम्यान राहिला. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिले. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

सात दिवसांपूर्वी पेट्रोल ३० पैशांनी महागले होते. तर डिझेलमध्ये १५ पैशांची कपात झाली होती.मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *