Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, ; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । भारतीय बाजारात सोन्याच्या किमती घसरण्याचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव सुमारे ०.२५ टक्क्यांनी घसरून ४७,५१० रुपये, तर चांदीचे वायदा भाव ०.२२% वाढून ६७,५२० रुपये प्रति किलो झाले.कमकुवत जागतिक बाजारातील पाच सत्रांत सोन्याच्या किमती जवळपास १००० रुपयांनी खाली आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एमसीएक्सवरील सोन्याची किंमत ४६,८५० ते ४८,४०० हजारांदरम्यान असेल.जागतिक बाजारपेठेत आज अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमती खाली आल्यात. स्पॉट सोन्याचे भाव औंस ०.२% खाली घसरून १,८०३.३३ डॉलर प्रति औंस होते. या आठवड्यात आतापर्यंत शेवटच्या पाच दिवसांत मौल्यवान धातू ०.४% खाली आहे.

 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मौल्यवान धातूच्या किमतीतील घसरण तात्पुरती आहे आणि सोन्याच्या गुंतवणूकदारांनी या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहिले पाहिजे. सराफा तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत लवकरच उलट होईल आणि ट्रेंड उलटल्यानंतर एका महिन्यात प्रति १० ग्रॅम ४८,५०० पर्यंत पोहोचेल.कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती मिळालेल्या सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील एप्रिल- मे महिन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात झाली आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये देशात तब्बल ७.९१ कोटी डॉलर्स इतक्या मूल्याच्या सोन्याची आयात झाली. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू खात्यात मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. चालू खात्यातील तुटीचा आकडा २१.३८ अब्ज डॉलर्स इतका आहे.विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *