मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणला तर उपमुख्यमंत्री अजित पवार साता-यात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । पावसामुळे झालेली भयवाह परिस्थिती आणि त्यानंतर झालेल्या जिवितहानी, वित्तहानी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरपरिस्थितीच्या भागात दाैरे करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणूला तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.(deputy-cm-ajit-pawar-visit-satara-wai-kolhapur-sangli-sml80)

पूर आणि भूस्खलन झालेल्या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करणार आहेत. आज (रविवार) उपमुख्यमंत्री पवार हे सातारा जिल्ह्याची पाहणी करतील.

त्यानंतर उद्या (साेमवार) उपमुख्यमंत्री पवार हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील कोरोना आढावा बैठक सांपल्यानंतर सताऱ्याकडे रवाना होणार आहेत. ते देवरुखवाडी व पाटण तालुका येथे भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *