आर्थिक व्यवहारासंबधी ‘हे’ नियम 1 ऑगस्टपासून बदलणार,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । 1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय, नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांतही बदल झाले आहेत. त्यामुळे तुमचा पगार किंवा पेन्शन सुट्टीच्या दिवशीही खात्यामध्ये जमा होईल.

ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ
आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केल्यामुळे इंटरचेंज शुल्क वाढले आहे. परिणामी आर्थिक व्यवहारांवर जादा शुल्क आकारले जाणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार
1 ऑगस्टपासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांत बदल केले आहेत. NACH ही यंत्रणा NPCI कडून हाताळली जाते. या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या NACH ही यंत्रणा बँका सुरु असतानाच काम करते. परंतु 1 ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहील.

आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढणे झाले महाग
आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तुम्ही एका महिन्यात फक्त चारवेळाच बँक खात्यामधून पैसे काढू शकता. त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. तसेच एका महिन्यात केवळ एक लाख रुपयांची ट्रान्झेक्शन लिमीट ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *