पावसाचे राज्यात तांडव ; अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 99 हून अधिक बेपत्ता; दिड लाखांहून नागरिकांचं स्थलांतरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । गेल्या पाच ते सहा दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचं थैमान पाहायला मिळालं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rainfall in Maharashtra)अनेक ठिकाणी दरड कोसळली (Landslide) तर काही ठिकाणी पूराच्या घटना घडल्या. गेल्या तीन ते चार दिवसात राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. मदत व पुनवर्सन विभागानं (Relief and Rehabilitation Department)यासंदर्भातली माहिती दिली आहे.

राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, एक लाख 35 हजार ( 1.35 lakh people to evacuate)नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. रायगड, (Raigad) रत्नागिरी (Ratnagiri) आणि सातारा (Satara) जिल्ह्यांमधील दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा शनिवारी 74 वर पोहोचला. रायगडमध्ये दरड कोसळल्यानं 53, रत्नागिरी जिल्ह्यात तीन आणि सातारा जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगडमध्ये 43, रत्नागिरीत 17 आणि साताऱ्यात 22 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. या बेपत्ता नागरिकांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

24 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या आकडेवारीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे 1 लाख 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. एकूण 112 मृत्यू आणि 3221 प्राणी मरण पावले आहेत. एकूण 53 लोक जखमी झाले असून 99 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागानं दिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळये येथे दरड कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 42 वर पोहोचली. त्यानंतर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे 5 आणि साखर सुतारवाडी येथे 6 जणांचा मृत्यू झाला. तळये गावात अजूनही 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. NDRF च्या पथकाकडून त्यांचा शोध सुरु आहे. शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या पोसरे गावात कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढले असून अद्याप 17 जण बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *