![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २७ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
सर्वांशी मनमिळावूपणे वागाल. चांगले वाहन लाभेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. सर्वांचे लक्ष वेधून घ्याल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
फार काळजी करू नये. झोपेची तक्रार मिटेल. भावंडाना प्रवास करावा लागेल. मनाचे चांचल्य दूर सारावे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
सांपत्तिक स्थिती सुधारेल. अत्यंत लाघवीपणे बोलाल. हसत-खेळत दिवस घालवाल. कामाचा ओघ वाढेल. घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
आपले विचार योग्यरीतीने मांडाल. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. टीकेला बळी पडू नका. काटकसरीने वागावे. संगत तपासून पहावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
उत्साहाच्या भरात कामे हाती घ्याल. कार्यप्रविणता वाढेल. हट्टीपणा करून चालणार नाही. वैवाहिक सौख्यात बहर येईल. कामात दिरंगाई येवू शकते.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
सामाजिक वादात लक्ष घालू नये. झोपेच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या. निराशा दूर सारावी. पायाचे विकार जाणवतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील. मनातील अपेक्षा पूर्ण करता येतील. वाहन विषयक कामे होतील. कौटुंबिक समाधानात रमाल. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कामात सकारात्मक बदल घडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. कलेतून आर्थिक प्रगती होईल. वाहनाचे काम पार पडेल. तुमचा मान वाढेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
वरिष्ठांशी मतभेद वाढवू नयेत. आपले स्थान जपण्याचा प्रयत्न करावा. प्रवास करावा लागेल. वडिलधाऱ्यांच्या विरोधाला समजून घ्यावे. मानसिक ताणाला बळी पडू नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
अकारण आलेली निराशा बाजूला सारावी. एकाच गोष्टीत अडकून राहू नका. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. कौटुंबिक सुखाला प्राधान्य द्याल. कामानिमित्त दूर गावी लागेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
पत्नीचे कौतुक कराल. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. एकमेकांबद्दलची ओढ वाढेल. तुमच्यातील वैचारिक बदल जाणून घ्यावा. बैठे खेळ खेळाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे पूर्ण होतील. मानसिक शांतता लाभेल. गोड पदार्थ खायला मिळतील. जुनी कामे निघतील.