महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाची उघड झाप . पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा दिलासा. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण….
कोयना धरणातून सध्या 32,749 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे .
नाशिक – दारण धरण क्षेत्रात पाण्याचा साठा वाढला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच.धरणातून पाण्याचा विसर्ग 1215 क्यूसेस ने आणखी वाढवला.
दारणातून सध्या 3196 क्यूसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.