‘द बीस्ट’; अमेरिका राष्टाध्यक्ष यांची स्वप्ना पलिकडील कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी भारतात येत आहेत. हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. लॅन्डीगनंतर पहिल्यांदा ट्रम्प जाणार आहेत, मोटेरातील सरदार पटेल स्टेडिअमला. ज्या स्टेडिअमचं त्यांना उद्घाटन करायचं आहे. रस्त्याचा वापर करत ट्रम्प ज्या गाडीने पोहोचणार आहेत, ती त्यांचीच गाडी असेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रस्त्याने प्रवास करण्यासाठीची ती त्यांची अधिकृत गाडी आहे. ट्रम्प ज्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर असतात तेथे ही कार ते सोबत नेतात. या गाडीचं नाव आहे द बीस्ट. ही कार पहिल्यांदा वापरण्यात आली २४ सप्टेंबर २०१८ रोजी. तेव्हापासून ट्रम्प या गाडीने प्रवास करतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठी या कारमध्ये डझनभर गोष्टी आहेत.
ट्रम्प यांना यायला अजून उशीर असला तरी ही कार भारतात पोहोचली आहे. या कारची आणखी सर्वात महत्वाची खासियत काय आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
या कारच्या मॉडेलचं नाव आहे – लिमजिन
कंपनी – कॅडीलॅक , जनरल मोटर्स
किंमत – १०.७ कोटी रूपये                                                                                    या कारची बॉडी ८ इंच जाडीची आहे. मिलिट्री ग्रेड आर्मरची आहे.
बोईंग विमान ७५७ जेटच्या केबिनचे गेट जेवढं जड असतं तेवढे या कारचे दरवाजे वजनदार आहेत.                                                                                                  कारच्या खिडकीत ५ लेअर असतात. काच आणि पॉलीकार्बोनेटच्या या लेअर असतात.
दबीस्ट या गाडीच्या खिडक्या बुलेट प्रुफ असतात.                                           ट्रम्प यांच्या द बीस्ट गाडीच्या मागील भागात एक कम्पार्टमेंट आहे. यात बसतात राष्ट्रपती ट्रम्प.
यात काचेचं पार्टिशीयन असतं. ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये असणारं पार्टिशन वेगळं करण्यासाचं स्वीच फक्त ट्रम्प यांच्याकडे असतं.

ट्रम्प यांच्या सीटजवळ एक सॅटेलाईट फोन लावलेला असतो, हा फोन जोडलेला असतो थेट अमेरिकन उपराष्ट्रपती यांना आणि अमेरिकन रक्षा विभाग पेंटागेनला.

या कारमध्ये हत्यारं देखील असतात. अत्याधुनिक शॉटगन, अश्रुधुरांचे गोळे हे सर्व यात असतं.

कारच्या पुढे हेडलाईटच्या खाली टिअर गॅस ग्रेनेड लॉन्चर देखील असतो.

कारमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या ब्लडग्रुपचं रक्त देखील नेहमी सुरक्षित ठेवण्यात येतं.

एमर्जन्सीत कारमध्ये ऑक्सिजन सप्लायची देखील व्यवस्था असते.

कधी एखादा केमिकल हल्ला झाला, तर या हल्ल्याचा परिणाम कारमध्ये बसलेल्या लोकांवर होत नाही.

या कारमध्ये फक्त ड्रायव्हरची खिडकी उघडू शकते ती देखील फक्त ३ इंच.

या कारचे टायर पंक्चर होत नाहीत, आणि बॉम्ब हल्ल्याचा देखील या कारवर कोणताही परिणाम होत नाही.

द बीस्ट या ट्रम्प यांच्या कारमध्ये पुढच्या बाजूला कॅमेरे लागलेले असतात, जे रात्रीच्या अंधारातही स्पष्ट पाहू शकतात.

या गाडीत स्टीलची रिम लागलेली आहे, कोणत्याही कारणाने कारचं नुकसान झालं तरी कार चालू शकते.

सर्वात शेवटी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, या गाडीच्या ड्रायव्हरला यूएस सिक्रेट सर्व्हिसकडून ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत देखील या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवू शकतो.

हल्ल्याच्या स्थितीतही गाडी सुरक्षित पुढे काढण्याचं ट्रेनिंग त्याला दिलं जातं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *