शिवजयंतीः पुणे वाहतुक मार्गात बदल ;

Spread the love

महाराष्ट्र २४ – पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या, बुधवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांसह ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. पुण्यातील भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळं मिरवणुकीच्या काळात शहरांतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत, तसंच काही वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील महत्वाच्या शहरांसह ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात मोठ्या संख्येनं मिरवणुका काढण्यात येणार आहे. मुख्य मिरवणूक संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास काढण्यात येईल. भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहनं उभी करण्यात मनाई करण्यात आली आहे. तसंच वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन केलं आहे.

मिरवणूक कालावधीत शहरातील भवानी माता मंदीर ते रामोशी गेट ते जुना मोटार थांबा, जुना मोटार स्टॅण्ड ते पदमजी चौक, ए. डी. वॅम्प चौक ते रामोशी गेट ते संत कबीर चौक, लक्ष्मी रोडवर संत कबीर चौक ते सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक, सोन्या मारुती चौक ते फडके हौद, बुधवार चौक ते मोती चौक, देवजीबाबा चौक ते फडके हौद, पुरम चौकातून बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकासह शनिवार वाड्याकडे जाणारा रस्ता, गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक, गाडगीळ पुतळा ते शिवाजी पुतळा, पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *