महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. काही दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी सोन्याचांदीच्या दरात थोडी वाढ झाली होती. मात्र, मंगळवारी सोन्याचांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. मंगळवारी सोन्याच्या दरात 257 रुपयांनी घट होऊन 47697 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
चांदीच्या दरात मंगळवारी 344 रुपयांनी घट होत चांदीचे दर 67211 रुपये प्रतीकिलो झाले आहेत. सोमवारी चांदीचे दर 67555 रुपये प्रतिकिलो असे होते. सोन्याच्या दरात घटन झाल्याने 24 कॅरेट सोन्याचे दर 47,697 रुपये प्रति 10 ग्रॅम असे झाले आहेत. 24 कॅरेटच्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची 1 ग्रॅमची किंमत 4369 रुपये आहे. 24 कॅरेट हे शुद्ध सोने असते. त्यात कोणतेही दागिने बनत नाही. दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरतात. त्यामुळे दागिन्यांना ठोसपणा येतो. येत्या काही दिवसांत सोन्याचांदीच्या दरातील चढउतार कायम राहतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.