महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अंध , दिव्यांग, विधवा , जेष्ठ नागरिक मिळत असतो मात्र त्यासाठी लागणारी कागद पत्र उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला मिळण्यास ज्यास्तवेळ लागतो ती लवकरात लवकर मिळावीत म्हणून तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काही प्रतिज्ञापत्र तहसीलदार कार्यालय येथील सुविधा केंद्रात उपलब्ध नाहीत ते सुध्दा तहसीलदार कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून अंध , दिव्यांग, विधवा व जेष्ठ नागरिकांना जास्त त्रास न होता एकाच ठिकाणी सर्व दाखले व प्रतिज्ञापत्र मिळतील त्यांचा वेळ व हेलपाटे वाचतील या संदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पिंपरी विधान सभा अध्यक्ष श्री.आनंद बनसोडे यांनी अप्पर तहसील कार्यालय आकुर्डी पिंपरी चिंचवड शहर व आमदार आण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन देण्यात आले अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.