महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं मीडियावर अनेक विषयांवरील मिम्स ,जोक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एवढच नव्हे तर अनेक गाणी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असंच एका मराठी गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. केवळ 4 आठवड्यातचं या गीताला 10 मिलियन व्ह्यूज मिळालेत.
मुंबई: आपल्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी एखादा कोणाचे काही खास फोटो, धम्माल मस्तीचे व्हिडिओ, तर कधी एखादं भन्नाट गाणं. असच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान झालं आहे. ‘ओ शेठ… तुम्ही नादंच केलाय थेट’ या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसवर हे गाणं पाहायला मिळत आहे. आणि अनेकांनी तर त्यांनी त्यांच्या रिंगटोन आणि कॉलरट्यूनवर हे गाणं ठेवून नाद केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शेठ या शब्दावरून नाशिकच्या संध्या केशे आणि उस्मानाबादच्या प्रणिकेत खुने या दोघांनी या गीताची रचना केली आणि संगीतबद्ध केलंय.
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली,
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’,
असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक लहान व्हिडिओ रिल्स बनवले जात आहेत. या गाण्याने तरुणाईला प्रचंड वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.