महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । आज स्थगित करण्यात आलेला दुसरा ट्वेन्टी-२० सामना उद्या खेळवण्यता येऊ शकतो, असे बीसीसीआयने सांगितले आहे. पण हा सामना जर उद्या खेळवायचा असले तर एक मोठी समस्या आता श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळापुढे असणार आहे.
आजचा सामान उद्या खेळवण्यात येऊ शकतो, पण त्यापूर्वी काही नियमांची पूर्तता करावी लागेल. कृणाल पंड्याला आता करोनाची लागण झाली आहे. पण त्यामुळे आता सर्व खेळाडूंची करोना चाचणी करावी लागणार आहे. या करोना चाचणीमध्ये जर सर्व खेळाडू करोना निगेटीव्ह सापडले तरच उद्या सामना खेळवण्यत येऊ शकतो. पण या करोनाच्या लवकरात लवकर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये काही क्रिकेटपटू जर करोना पॉझिटीव्ह आढळले तर उद्यादेखील सामना होऊ शकत नाही. त्यामुळे आता उद्या सामना खेळवण्यात ही सर्वात मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे आज सर्व खेळाडूंच्या करोनाच्या चाचण्यांचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच लक्ष लागलेले असेल.