संरक्षक भिंत हा उपाय नाही, पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं पाहिजे : फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 27 जुलै । राज्यपालांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सुचनेनुसार आहे. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्यांनी बोलावलं होतं. राज्यपाल हे प्रशासकीय प्रमुख आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संरक्षक भिंत बांधणं हा त्यावरचा उपाय नाही. पुरपरिस्थितीला नविन आव्हानं उभी आहेत. राज्य सरकार जिथे प्रयत्न करत आहे त्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असेही फडणवीस म्हणाले. आपल्याला अलमट्टीचा विसर्ग हा वाढवावा लागेल. आम्ही विरोधी पक्षात असल्याने तसंही आमच्या दौऱ्यावर शासकीय यंत्रणा येत नाही. तसा जीआरच राज्य सरकारने काढला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *