1 ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढणं महागणार, ; RBI ने बदलला नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 27 जुलै । किंग सेवा (Banking Services) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे.

हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात. कार्ड इशू करणारी बँक इंटरचेंज फी पे करते. हे शुल्क बँका आणि एटीएम कंपन्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. सध्या हे इंटरचेंज शुल्क वित्तिय व्यवहारांसाठी 15 रुपये तर गैरवित्तिय व्यवहारांसाठी 5 रुपये आहे.

1 ऑगस्टपासून लागू होणार दर

आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे. हे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला ग्राहकांना 5 ट्रान्झॅक्शन मोफत मिळताच. यामध्ये वित्तिय आणि गैर वित्तिय (Financial and Non-Financial Transaction) व्यवहारांचा समावेश आहे. यानंतर तुम्ही कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं तर त्यावर साधारणत: 20 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन असं शुल्क आकारलं जातं. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये 3 तर नॉन मेट्रोसिटीमध्ये 5 ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. आरबीआयने आता ही इंटरचेंज फी 20 रुपयांवरुन 21 रुपये केली आहे, जी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *