हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

Spread the love

महाराष्ट्र २४- महाराजांची यश मिळवण्याची सुत्र कोणती ? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांचे केवळ नाव ऐकले, घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. अशा शिवाजी महाराजांच्या यशाची सुत्र काय होती, जाणून घेऊया…
जिद्द आणि बुद्धिमत्ताः शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणी आल्या, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले. समस्या आहेत म्हणून शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत, तर जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.    आपलेपणा आणि माणुसकीः शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादु होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा ते सन्मान करायचे. एखादा मावळा धारातिर्थी पडला की, कणखर आणि अविचल असलेल्या महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचे. त्यामुळेच महाराजांच्या एका शब्दासाठी मरायला आणि मारायल मावळे तयार व्हायचे.                                              कणखर आणि दूरदृष्टीःशिवाजी महाराज कणखर होते. त्यांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. खंबीर आणि अविचल असणाऱ्या महाराजांना समृद्धीचा नियम माहिती होता. शत्रुला लुटून त्याच्याच साधनांनी त्याला मात दिली.
भयमुक्त आणि व्यवस्थापनःआपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळत गेले. आग्र्याहून सुटका ही मोहीम याचेच चपखल उदाहरण म्हणावे लागेल.
शिवजयंतीः महाराजांच्या ‘या’ गडकिल्ल्यांची माहिती आहे का?
तणावमुक्त आणि सकारात्मकताःशिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एखाद्या आख्यायिकेप्रमाणे भासते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला. शिवाजी महाराजांची देवावर अगाध श्रद्धा होती. त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळत असे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीः
शिवाजी महाराजांची राहणी एकदम साधी होती. स्वारीला गेल्यावर महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असूनही महाराज साधेपणाने वागायचे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं मनोबल वाढवायचे, त्यांना प्रेरित करायचे, उत्साह वाढवायचे. महाराज कधीही चिंतेत राहायचे नाहीत. सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराजांमुळे सर्वांमध्ये एक वेगळी उर्जा यायची. प्रत्येक मावळ्याचे शिवाजी महाराज आदर्श होते.
संयम आणि सुरक्षितताः
शिवाजी महाराज नेहमी संयमाने वागायचे. रयतेप्रमाणे मावळ्यांच्या सुरक्षिततेलाही त्यांनी प्राधान्य दिले. आपल्या मावळ्यांसाठी महाराजांनी विटा नावाचे एक हत्यार बनवले. विटा म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येईल असा भाला. हे हत्यार वापरून फक्त तीनशे मावळ्यांनी एक प्रसंग आपल्या रक्ताने इतिहासात कोरून ठेवला, तो म्हणजे पावन खिंडची घटना.
दुर्गम गड-किल्ले आणि गनिमी कावाः
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडावच केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे ४०० गड-किल्ले होते, असे सांगितले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *