Petrol-Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 लीटर पेट्रोलचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । पेट्रोलचे दर सर्वाधिक पातळीवर असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून सामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरात आजही दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर (Petrol Price in Mumbai) 107.83 रुपये आहेत तर डिझेल (Diesel Price in Mumbai) 97.45 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळते आहे. 42 दिवसात पेट्रोलचे दर 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. शिवाय डिझेलचे दर सोमवारी काहीसे कमी झाले होते. 15 जुलै रोजी डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

>> दिल्ली – पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

>> मुंबई – पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई – पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता – पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

>> बंगळुरु – पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

19 राज्यात दर आहेत शंभरीपार

देशभरातील एकूण 19 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार आहेत. या यादीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख इ. चा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *