LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस, पटापट तपासा नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केलीय. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांनी वाढ केली. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलिंडर झाली.

…म्हणून 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत
तेल कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरलेल्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत. त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 834.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची किंमत
विनाअनुदानित 14.2 किलो सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 834.50 रुपये, कोलकात्यात 861 रुपये, मुंबईत 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 850.50 रुपये प्रति सिलिंडर आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत
सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. सर्वाधिक वाढ चेन्नईमध्ये 73.50 रुपये प्रति सिलिंडर झाली. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 73 रुपयांनी वाढून 1623 रुपये झाली. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 72.50 रुपयांनी वाढून 1629 रुपये, मुंबईत 72.50 रुपयांनी वाढून 1579.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.50 रुपयांनी 1761 रुपये प्रति सिलिंडर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *