Maharashtra 12th result date : अखेर 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर ;

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 2 ऑगस्ट । राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी (August) लागणार आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा (Official Announcement) करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in. .

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालीची पद्धत

2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.12 वी साठी सारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *