दिवंगत नगरसेवक जावेद रमजान शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । कोरोना काळात विक्रमी 145 जणांचे रक्तदान सदर शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब भाई शेख यांचे हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.आझम भाई पानसरे, शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे, माजी महापौर योगेशजी बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते इकबाल खान , माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी,महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका सुलक्षणा ताई शिलवंत,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक दत्ता नाना पवळे,प्रदेश कार्यध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर,युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष यश दत्ता काका साने,अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ कुरेशी आदी मान्यवर व संपूर्ण शेख कुटुंब, जावेद शेख यांच्यावर प्रेम करणारे आकुर्डीतील बहुतांश नागरिक आणि संपूर्ण मित्र परिवार उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात नागरिकांनी मोफत रक्त तपासणी, मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्म्या वाटप, मोफत दन्त तपासणी, मोफत MRI मोफत CT SCAN ,मोफत XRAY मोफत स्त्री रोग तपासणी, या सर्वांचा लाभ घेतला यावेळी 145 जनांनी रक्तदान केले. कोरोना काळात आणि पुरग्रस्तांसाठी मदत करणं उल्लेखनीय कार्य करण्यारया आकुर्डीतील अस्तित्व फाउंडेशन आणि खिदमत ए आवाम वेल्फेअर या सामाजिक संस्थाचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शिबिरासाठी स्टार हॉस्पिटल आकुर्डी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ अमित वाघ , प्रसिद्ध दन्त चिकित्सक डॉ देवदत्त कांबळे डॉ अथर्व देवदत्त कांबळे, मोरया ब्लड बँक, व नेत्र तपासणी साठी हेल्प मेडिकल चॅरिटेबल फाउंडेशन सातारा यांचे विशेष सहकार्य लाभले सदर शिबीराचे आयोजन झाकीर रमजान शेख , शानुर हमीद शेख यांनी केले होते, शिबीराचे संयोजन आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ , प्रगती महिला विकास मंडळ, आपुलकी मित्र मंडळ व समस्त जावेद शेख मित्र परिवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *