बुधवार पासुन धावणार पीएमपीच्या ११०० बस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । प्रवासी संख्या वाढू लागल्यामुळे पीएमपीच्या (PMP) बसची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवार (ता. ४) पासून सुमारे ११०० बस पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) धावतील. (1100 PMP buses will run from tomorrow)

लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे चार लाख २५ हजारांहून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे दररोज ७० ते ७५ लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहेत.

विशेषतः उपनगरे आणि जिल्ह्यांतील बसच्या वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. याबाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे म्हणाले, ‘‘सध्या ९५० ते १००० बस दोन्ही शहरांत धावत आहेत. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता बस वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान १०० बस बुधवारपासून वाढविण्यात येतील. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून प्रवाशांना प्रवास करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्यानुसार चालक, वाहकांना सूचना दिल्या आहेत.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *