Google चं हे फीचर धोकादायक Apps पासून सुरक्षित ठेवेल तुमचा फोन, असा करा वापर

 72 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । मागील काही वर्षात Apps द्वारे युजर्सचा डेटा चोरी करणं, ऑनलाईन फ्रॉड करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे कोणतंही App डाउनलोड करताना, ते इन्स्टॉल करताना ते फेक तर नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. जर चुकीचं App मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं, तर असे Apps युजर्सची खासगी माहिती, बँकिंग डिटेल्स चोरी करू शकतात. यामुळे बँक फ्रॉडचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं असून फोन धोकादायक App पासून प्रोटेक्टेड ठेवणं आवश्यक आहे.

Google Play Protect तुमच्या डिव्हाईसची सुरक्षा आणि बचाव करण्यासाठी मदत करतं. ज्यावेळी अ‍ॅप इन्स्टॉल केलं जातं, त्यावेळी Google Play Protect त्या अ‍ॅपचा तपास करतं. तसंच वेळोवेळी फोनही स्कॅनही करतं. जर यात नुकसान करणारे अ‍ॅप्स आढळले, तर युजरला तशी सूचना केली जाते. Google Play Protect तुमच्याकडे आढळलेलं अ‍ॅप तोपर्यंत बंद करू शकतं, जोपर्यंत युजर ते अ‍ॅप अनइन्स्टॉल करत नाही.

Google Play Protect कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी, ते सुरक्षित आहे का याची तपासणी करतं. तसंच इतर स्त्रोतांद्वारे डाउनलोड केलेले, नुकसान करणाऱ्या अ‍ॅपची तपासणी करतं. अशी अ‍ॅप्स आढळल्यास इशारा दिला जातो आणि हे अ‍ॅप्स हटवले जातात.

Google Play ओपन करा. इथे उजव्या बाजूला प्राफाईल आयकॉनवर क्लिक करा. Play Protect वर क्लिक करा. Play Protect सर्टिफिकेशन सेक्शनमध्ये डिव्हाईस Play Protect ने प्रमाणित आहे की नाही हे तपासता येईल,

Google Play Protect डिफॉल्ट रुपात सुरुच असतं. ते बंदही करता येतं. परंतु Google Play Protect नेहमी सुरू ठेवणं सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *