दुचाकीसाठी सरकारची नवी नियमावली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीसाठी नवी नियमावली जारी केली आहे. दुचाकीवर मागे बसणाऱ्यांची सुरक्षितता आणि रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमावलीनुसार, दुचाकीला सीटच्या दोन्ही बाजूला हॅन्ड होल्ड आवश्यक आहे. जेणेकरुन जोरात बेक मारल्यास मागे बसणाऱ्या व्यक्तीला त्या हॅन्ड होल्डची मदत होईल. मागे बसणाऱ्यासाठी दोन्ही बाजूला पायदानही असावे. तसेच मागील टायरचा अर्धा भाग सुरक्षितरित्या कव्हर केलेला असावा, त्यामुळे मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे चाकामध्ये अडकणार नाहीत.

याबरोबरच दुचाकीला एक लहान कंटेनर बसवण्याचेही निर्देश जारी करण्यात आले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी. हा कंटेनर दुचाकीच्या सीटच्या मागील बाजूस लावावा. तरच पाठीमागे दुसऱ्या व्यक्तीला बसण्याची परवानगी असेल. हा कंटेनर मागील सीटजवळ लावल्यास चालकाला एकट्यालाच या दुचाकीवरुन प्रवास करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *