Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमती ऐतिहासिक स्तरावर,; आजचे दर पहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । कच्च्या तेलाच्या किमतींमधील जागतिक स्तरांवर होणाऱ्या उतार-चढावात भारतात मात्र इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सलग 19व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तेल कंपन्यांच्या वतीनं पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर असल्यामुळे आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नाही. 18 जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात 17 जुलै रोजी पेट्रोलची किंमत 29 ते 30 पैशांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत
दिल्ली 101.84 89.87
मुंबई 107.83 97.45
चेन्नई 102.49 94.39
कोलकाता 102.08 93.02
बंगळुरु 105.25 95.26

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *