ऑनलाइन नोकरी शोधताना सावधान, सायबर पोलिसांचे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱया गेल्या तर बऱयाच जणांचे व्यवसाय ठप्प पडले. त्यातच लॉकडाऊन असल्याने नागरिक ऑनलाइन पद्धतीने नोकरी शोधू लागले आहेत. पण सायबर भामटय़ांनी याचाच गैरफायदा उचलत ऑनलाइन नोकरी शोधणाऱयांची फसवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. असे गुन्हे अलीकडच्या काळात वाढल्याने नागरिकांना ऑनलाइन नोकरी शोधताना आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे.

बरेचजण नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करतात. सायबर भामटे या अर्जांची शिताफीने माहिती मिळवतात. त्यानंतर हे भामटे नामवंत कंपन्यांच्या नावाने एसएमएस पाठवतात आणि त्यामध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरायची लिंक देतात व त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरण्यास सांगतात. तसेच लिंकवर रजिस्टर करायला लावून मग पैसे भरल्याशिवाय पुढे काही होणार नाही असे सांगून पैसे उकळतात अशी सायबर भामटय़ांची मोड्स ऑपरेंडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *