नाशिकमध्ये कृषीमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ; रानभाज्या महोत्सवाचं राज्यभरात आयोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । पावसाच्या दिवसात डोंगर कपारी च्या कुशीत असलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्म ही उपयुक्त असतात अशा रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने नाशिक मध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलाय.

महाराष्ट्र शासन आणि राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव सुरू करण्यात आलाय. याचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते. 9 ऑगस्ट पासून क्रांती दिनाचे औचित्य साधून मागील वर्षापासून कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला राज्यात दीडशे ते दोनशे ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभला आहे.

रानभाज्या महोत्सवात सहभागी झालेल्या महिलेनं रानभाज्यांविषयी माहिती दिली. यंदाच्या चालू वर्षी जवळपास पाचशे ठिकाणी हा महोत्सव आयोजित करणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात चार ते पाच ठिकाणी हा रानभाज्या महोत्सव भरवण्यात येणार असले तर दादा भुसे यांनी सांगितले

या कृषी महोत्सवात 80 प्रकारचे वाण असून भाजीपाला कंद उपलब्ध करून देण्यात आले आहे शिवाय प्रत्येक स्टॉलवर त्या वाहनाचे आणि भाज्या चे महत्व विशद केल्याचंही दिसतंय. रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक आहेत.त्यामुळे आरोग्यला चांगला फायदा होत आहे.या मोहत्सवात करटोली,सुरण,विंडा, टाकळा, कुडा,गुळवेल,आंबूशी,पाथरी, या भाज्यांनि विशेष लक्ष वेधलं. त्यामुळे शहर वासीयांनी या रानभाज्याचं महत्व लक्षात घेता सेवन करण्याची गरज आहे. संपूर्ण राज्यभरात रान भाज्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *