महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट ।
जेष्ठमध आणि केशर
केस गळती थांबवण्यासाठी आणि टक्कल कमी करण्यासाठी जेष्ठमध वापरू शकता. यासाठी थोडं जेष्ठ मध घ्या. त्यात चिमूटभर केशर आणि दुधाचे काही थेंब घाला. नंतर त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.
केळी आणि लिंबू
एक केळं चांगलं मॅश करा. त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. यानंतर, ही पेस्ट हेअर कलर ब्रशच्या मदतीने डोक्यावर लावा, काही तासांनंतर शॅम्पू करा. यामुळे केस गळणं देखील कमी होतं आणि केस पुन्हा वाढू लागतात.
कांदा
कांदा सोलून मधून दोन भाग करा. यानंतर, जिथे केस जास्त गळत आहेत. त्या ठिकाणी कांदा डोक्यावर हलक्या हाताने चोळा. हा उपाय रोज 5 ते 7 मिनिटं करा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येण्यास सुरवात होईल.
कलोंजी
केसांचं गळणं थांबवण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी कालोंजीचा (कांद्याचं बी) वापर करू शकता. कलोंजी बारीक करून पावडर तयार करा. नंतर ही पावडर पाण्यात मिसळा आणि या पाण्याने आपले केस धुवा. काही दिवसात केस गळणं कमी होण्यास सुरवात होईल आणि डोक्यावर नवीन केसही वाढू लागतील.
आवळा-कडुलिंब
थोडी आवळा पावडर आणि कडुलिंबाची पानं पाण्यात नीट उकळा. आठवड्यातून दोनदा या पाण्याने आपलं डोकं धुवा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येऊ लागतील.
कोथिंबीर
केस गळणं थांबवण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी कोथिंबीरचा वापर करू शकता. यासाठी कोथिंबीर बारीक वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट टाळूवर लावा आणि काही तासांनी शॅम्पू करा. काही दिवसात नवीन केस येण्यास सुरुवात होईल.