Vespa 75th स्पेशल एडिशन स्कूटर हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या काय आहे खास…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । पियाजिओ इंडियाने आपल्या 75 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपली नवीन Vespa स्कूटर हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. हा Vespa चा 75 वा स्पेशल एडिशन आहे. कंपनीने याची बुकिंग सुरू केली आहे. ही स्पेशल पद्धतीने बनविलेली Vespa 75 मर्यादित संख्येमध्ये हिंदुस्थानातील Vespa च्या सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. ग्राहक ही स्कूटर 5 हजारांच्या टोकन रक्कमसह अधिकृत विक्रेत्यांकडे व कंपनीच्या ई-कॉमर्स वेबसाइटला भेट देऊन बुक करू शकतात. आज आपण याच स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Vespa ची पहिली स्कूटर 1940 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आता Vespa चा 75 वा एडिशन कंपनीने बाजारात उतरवला आहे. Vespa ने ही नवीन स्कूटर पूर्णपणे स्टील बॉडीत सादर केली आहे. या स्कूटरच्या लॉन्चिंग दरम्यान बोलताना पियाजिओ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिएगो ग्राफी म्हणाले, ‘आम्ही Vespa च्या 75 व्या एडिशनच्या माध्यमातून स्वातंत्र्य सोहळा साजरा करत आहोत. हिंदुस्थानात Vespa च्या प्रवासाचा हा टप्पा अशा वेळी आला आहे, जेव्हा हिंदुस्थान स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *