महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । पुणे शहर (pune city) आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे (IMD) देण्यात आली. पुण्यात १ जूनपासून आतापर्यंत ३७३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा ३०.२ मिलिमीटर पाऊस कमी पडल्याचेही खात्याने स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडला. शहरात मात्र तुरळक सरींनी हजेरी लावली. शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २.६ मिलिमीटर पाऊस पडला. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ०.४ मिलिमीटरची नोंद झाली होती. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत. येत्या शनिवारपासून (ता. २१) पुढील तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.