![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील (Kas flower plateau) नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना (Tourists) यावर्षी खुले करण्यात येणार असून कोरोनाचे (Coronavirus) नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने (Online Booking) पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या पंचवीस ऑगस्टनंतर स्थानिक परिस्थितीनुसार, एक सप्टेंबरपर्यंत अधिकृतरित्या फित कापून हंगामाचे उद्घाटन करण्यात येईल.
हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने (Joint Executive Forest Committee) बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.