हा ऑल राऊंडर देतोय मृत्यूशी झुंज ; तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मृत्यूशी झुंज देत असलेला न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ख्रिस क्रेन्सच्या तब्येतीबाबत एक महत्त्वाची अपडेट (Former New Zealand Allrounder Chris Cairns health update) आहे. क्रेन्सची तब्येत पूर्वीपेक्षा सुधारली आहे. क्रेन्सचे ऑपरेशन झाले असून त्यानंतर त्याला देण्यात आलेला लाईफ सपोर्ट काढून घेतला असून त्यानं कुटुंबीयांशी संवाद देखील साधला आहे. 51 वर्षांच्या क्रेन्सला ऱ्हदयाचा त्रास आहे. त्यामुळे त्याला 9 ऑगस्ट रोजी कॅनबेरामधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत ANI नं दिलेलेल्या वृत्तानुसार, ‘क्रेन्सच्या तब्येतीचा धोका अजून टळलेला नसला तरी ती स्थिर आहे. त्याने हॉस्पिटलमधून सिडनीमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबीयांशी संवाद देखील साधला. या कठिण परिस्थितीमध्ये त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचे क्रेन्सच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

ख्रिस क्रेन्सनं 1989 ते 2006 या कालावधीमध्ये 62 टेस्ट, 215 वन-डे आणि 2 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली केनियामध्ये झालेली पहिली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा क्रेन्सच्या शतकाच्या जोरावरच न्यूझीलंडनं भारताता पराभव करुन जिंकली होती. त्याच्या काळातील दिग्गज ऑल राऊंडरमध्ये क्रेन्सचा समावेश होता. त्याचे वडील लान्स क्रेन्स हे देखील न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.

ख्रिस क्रेन्स इंडियन क्रिकेट लीग (ICL) या क्रिकेट स्पर्धेतही खेळला होता. तसेच त्यानंतरच्या काळात त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. या प्रकरणात 2015 साली कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. सध्या तो एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *