राज्यातील सर्व नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतरच बुस्टर डोसचा विचार ……. : अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । पहिला डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसची मुदत उलटून जात असल्यामुळे आणि लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पुणे शहरसह जिल्हयात दुसरा डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्राधान्याने डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी पहिला डोस घेतला नाही, अशा नागरीकांना आणखी काही काळ थांबवे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाली. गेल्या आठ महिन्यात पुणे शहरासह जिल्हयातील ७१ लाख ३९ हजार नागरीकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांचे हे प्रमाण हे केवळ १८ लाख ६५ हजार एवढेच आहे. तर एक डोस झालेल्यांची संख्या ५२ लाख ७३ हजार एवढी आहे. आहे. लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग अतिशय कमी असल्याबाबतचे वृत्त आज सकाळने दिले होते.

दरम्यान आज पुणे शहरसह जिल्हयातील कोरोनाचा परिस्थतीतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले,‘‘पुणे,पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. असे असून देखील टेस्टींगची संख्या कमी करू नका, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र लस कमी उपलब्ध होत आहे. ती उपलब्ध करून घेण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत. टास्क फोर्सने केलेल्या सूचनेनुसार पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना दुसरा डोस मुदतीत मिळत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे अशा नागरीकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्हात पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’

पुणे जिल्हयासाठी लस प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत सिरम्‌ इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याशी विभागीय आयुक्तांची चर्चा झाली आहे. कंपनीवर प्रचंड ताण आहे. देशाच्या विविध भागात लस पुरविली जाते आहे. त्यांची ही इच्छा पुण्याला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिरम्‌ कडून जादा लस उपलब्ध झाल्यास ती झोपडपट्टीतील नागरीकांना प्राधान्याने दिली जाईल, असेही पवार म्हणाले.

दोन डोस झालेल्या नागरीकांना बुस्टर डोस बाबत विचारले असता, पवार म्हणाले,”राज्यातील सर्व नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतरच बुस्टर डोसचा विचार करू. बोस्टर डोस दिला पाहिजे.’’

”भारत बायटेक या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला मांजरी येथील जागा देण्यात आली आहे. त्यावर पवार म्हणाले,‘ ज्या दिवसांपासून या कंपनीचे लस निर्मिती सुरू होईल. त्या दिवशी त्यांना पुण्यासह महाराष्ट्रला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती करण्यात येईल.’’

”पुणे शहरात कोरोनाबाधितांचा दर हा २. ५ टक्क्यांवर आला आहे. तर मुत्यूदर २.३ टक्क्यांवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण ३.१ टक्के आणि १.४ टक्के आहे. तर ग्रामीण भागात हे प्रमाण ३.९ टक्के आणि १.२ टक्क्यांवर आला आहे”, असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *