महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । राष्ट्रवादी पक्षाने मंडल आयोग लागू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत आणि सर्वप्रथम महाराष्ट्रात मंडल आयोग ची अंमलबजावणी केली…..ज्या मुळे समाजातील मागासलेल्या जाती, वंचित घटक राजकीय व सामाजिक प्रवाहात यायला सुरुवात झाली…राष्ट्रवादी पक्षामुळे अनेक दुर्लक्षित जातींचा सामाजिक विकास झाला. अनेक घटकांचे वेगवेगळे सेल काढून त्या त्या घटकांना विकासीत होण्याची संधी प्राप्त झाली…. सेल मध्ये आपलीच लोक असल्यामुळे एकमेकांना खुल्या मनाने चर्चा करता येऊ लागली. आपल्या समस्या काय आहेत त्या कशा प्रकारे सोडवायच्या याचे नियोजन करून त्या वरिष्ठांपर्यंत पोहच करायचे धाडस निर्माण झाले….यातूनच हळु हळू मानसीक विकास होऊन राजकीय सत्तेची कामकाजाची पद्धत अवगत झाली….गाव पाटलां बरोबर काम करत असताना गावगराडा चालवायचे मनोधैर्य वाढले. ग्रामविकासात आपला पण खारीचा वाटा आहे याचा अभिमान दुर्लक्षित घटकांना वाटायला लागला.
आपण पण सरकारच्या कामकाज भाग घेऊ शकतो असा आत्मविश्वास वाढला……एकंदरीत राष्ट्रवादीमुळे अनेक जाती घटकांचा राजकीय, सामाजिक आर्थिक विकास झाला….परीणामी मागासलेल्या जातींमध्ये सुधारणा होऊन सवर्ण उच्च जाती बरोबरीने समाजात वावरण्याचे जे भय होते ते हळु हळू कमी झाले….जाती जातींमधील दुरावा कमी झाला. जातीयता मानू नये अशी धारणा निर्माण होऊ लागली जाती जातींबाबत उघड उघड बोलायची एकमेकांना समोरासमोर कमी लेखायची हिम्मत कमी झाली. अशाप्रकारे राष्ट्रवादी मुळे जातीयता कमी झाली आहे……पि.के.महाजन.