पुढील ३ महिने चाहत्यांसाठी मोठी पर्वणी; असे आहे क्रिकेटचे भरगच्च वेळापत्रक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । पुढील काही महिने क्रिकेट चाहत्यांसाठी फारच बिझी ठरणार आहेत. एका पाठोपाठ एक अशा क्रिकेट मालिका आणि स्पर्धा होणार असून फक्त भारतीय नव्हे तर जगातील सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवाणी ठरणार आहे. त्यातही भारतीय क्रिकेट संघासाठी पुढील ९० दिवस खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज असतील.

भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन लढती झाल्या असून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरी लढत २५ ऑगस्टपासून तर चौथी लढत २ सप्टेंबर आणि पाचवी आणि अंतिम कसोटी १० सप्टेंबरपासून होणार आहे.

इंग्लंड दौरा संपताच भारतीय संघ आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये देखल होईल. इंग्लंड दौरा आणि आयपीएलमध्ये फक्त पाच दिवसांचे अंतर आहे. आयपीएलचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलची अंतिम लढत १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आयपीएल संपताच दोन दिवसांनी टी-२० वर्ल्डकपची सुरूवात होईल. १७ ऑक्टोबर रोजी पहिली लढत होणार आहे. भारतीय संघाची लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपचे आयोजन युएमध्ये होणार असल्याने खेळाडूंना धावपळ करावी लागणार नाही.

असे असणार आहेत पुढील ३ महिने क्रिकेटचे वेळापत्रक

२५ ते २९ ऑगस्ट- इंग्लंडविरुद्ध तिसरी कसोटी
२ ते ६ सप्टेंबर- इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी
१० ते १४ सप्टेंबर- इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी
पाच दिवसांनी म्हणजे १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात
१५ ऑक्टोबर रोजी आयपीएलची फायनल मॅच होणार
१७ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकपची सुरूवात
२४ ऑक्टोबर भारताची पाकिस्तानविरुद्ध लढत
३१ ऑक्टोबर भारताची न्यूझीलंडविरुद्ध लढत
३ नोव्हेंबर भारताची अफगाणिस्तानविरुद्ध लढत
५ नोव्हेंबर भारताची बी १ संघाशी लढत
८ नोव्हेंबर भारताची ए २ संघाशी लढत
१० ते ११ नोव्हेंबर रोजी सेमीफायनल लढती
१४ नोव्हेंबर रोजी फायनल मॅच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *