ह्या माजी कर्णधारला पाहिजे पाकीस्थानचे चे नागरिकत्व;

Spread the love

महाराष्ट्र २४- वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेतील पेशावर झलमी संघाच्या मालकांनी सॅमीचा अर्ज पाक राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे. सॅमी पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत पेशावर संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

“डॅरेन सॅमीला पाकिस्तानचं नागरिकत्व मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या पाक राष्ट्रपतींच्या कार्यालयात हा अर्ज पोहचलेला आहे. पाक क्रिकेट बोर्डाकडून यासाठी शिफारसीची गरज लागणार आहे, यासाठी मी विनंतीही केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांकडून शिफारस आल्यानंतर सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो”, पेशावर संघाचे मालक जावेद आफ्रिदी स्थानिक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामांमध्ये सॅमीने सहभाग घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झाल्यानंतर सॅमीनेही आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *