महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट ।
मेष : आजचा व्यवहार खूप सौम्य ठेवा. आजच्या व्यवहारामुळे परिवर्तनाची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाकडे मनापासून लक्ष द्या.आरग्य ठीक राहील .
वृषभ : आज चांगल्या लोकांच्या संपर्कात याल. तुमच्या यशस्वी जीवनात यांचं मार्गदर्शन आणि मदत महत्वाची ठरेल. नवीन मित्र भविष्यात तुमचे सहकारी बनतील. दिवस चांगला जाईल .
मिथुन : गुरूवारी तुमचं भाग्य उत्तम असेल. आज मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. या करता काही गोष्टी ठरवून कराव्या लागतील. व्यवहारात चतुराई महत्वाची ठरेल.
कर्क : गुरूवारी कामात चांगल यश मिळेल. मोठी अथा दिग्गज मंडळी आज तुमचा सत्कार करतील. आज तुमची प्रतिभा तुमचं भविष्य बदलणार आहे. प्रेमसंबंधात संवेदनशीलता असावी.
सिंह : गुरूवारी कामात मोठ यश मिळेल. तुमची मेहनत आणि भाग्य याचा सुरेख मेळ अनुभवता येईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात चांगल्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. घरी पाहुणे मंडळी येतील त्यामुळे दिवस चांगला जाईल. आज गुरूजनांचं स्मरण कराल. आजचा दिवस महत्वाचा आहे.
तुळ : कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्यांसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.
वृश्चिक : तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यास उत्सुक राहाल. हा काळ तुमच्यासाठी उत्साही असेल. कुटुंबातील कोणत्याही विषयावर तुमचं नियंत्रण ठेवण्याची गरज असेल. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
धनु : वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य पूर्णपणे प्राप्त होईल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो,
मकर : तुम्हाला तुमच्या अपेक्षांचं संतुलन ठेवावं लागेल. काही लोक कुटुंबात आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.
कुंभ : तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेसह सर्व कार्य हाताळू शकाल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्या.
मीन : तुमच्यात आणखी आत्मविश्वास वाढेल. लवकरच तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.