अनघा रत्नपारखी आणि अनंदिता मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली इन्नरव्हिल क्लब ऑफ पिंपरीचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

Loading

बाभुळवाडे पारनेर येथील केदारेश्वर विद्यालयाला शालेयपयोगी वस्तू भेट

महाराष्ट्र 24 – पिंपरी; दैनंदिन जीवनात आपल्याच सुखसोयींमध्ये मग्न असताना आपल्यासारखेच माणूस म्हणून जन्माला आलेली कित्येक मुले गावागावातन साध्या साध्या गरजेच्या गोष्टींनाही मुकली आहेत. याच जाणिवेतून तसेच निर्मोही भावनेतून 1997 रोजी पिपंरी येथे स्थापन झालेल्या इन्नर व्हिल क्लबच्या माध्यमातून इन्नर व्हिल क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा अनंदिता मुखर्जी यांच्या व माजी अध्यक्ष अनघा रत्नपारखी यांच्या नेतृत्त्वाखाली 20 फेब्रुवारी रोजी बाभुळवाडे पारनेर येथील केदारेश्वर विद्यालयाला शालेयपयोगी वस्तू भेट देऊन स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. या विद्यालयात सुमारे 180 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय पाहून सुमारे 1 हजार लिटरची पाण्याची टाकी, प्रय़ोगशाळेतील रासायनिक वस्तू ठेवण्यासाठी कपाट, ग्रंथालयासाठी कपाट, त तसेच चारही वर्गासाठी पंखे तसेच विविध खेळांचे साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील राउत सर यांनी केले. तर अनंदिता मुखर्जी व वैजयंती घारपुरे यांनी अभ्यासाचे व खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विषद केले. शाळेतर्फे उपस्थित मान्यवांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.
शाळेचे मुख्याद्यापक राऊत सर तसेच इतर शिक्षक वृंदानी उपस्थित मान्यवरांचे तसेच इन्नर व्हिल क्लब ऑफ पिंपरीचे आभार मानले. यावेळी मुलींना सद्य परिस्थितीत उपयुक्त ठरणारा विषय म्हणजे परपुरुषांचा गुड टच, बॅड टच यावर क्लबच्या माजी अध्यक्षा मनिषा समर्थ यांनी अतिशय चांगले व्याख्यान करत शाळेतील मुलींशी सुसंवाद साधला. यावेळी इन्नर व्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा अनघा रत्नपारखी, सदस्या सुनीता कुलकर्णी, कार्यकर्त्या अमृता नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *