![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी (Gold Price Today) आज गोकुळाष्टमीच्या दिवशी सुवर्णसंधी चालून आली आहे. सोनं खरेदी करण्यासाठी करण्यासाठी गोल्डन चान्स आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव (Gold price in International Market) आज घसरले आहेत, तर चांदीमध्ये (Silver price today) किंचित घट झाली. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याला 46 हजार 858 रुपये प्रति 10 ग्रॅम (Price of 10 Gram Gold now) इतका भाव मिळाला .त्याचबरोबर चांदी 62,313 रुपये प्रति किलो आहे.
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 199 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली. तरीही सोनं 46 हजार रुपयांच्या खाली न जाता त्याच पातळीवर टिकून आहे. दिल्लीत आज 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत आज 46,389 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,814 डॉलर प्रति औंस झाली आहे.
सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही किंचित घसरण बघायला मिळाली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचे भाव 250 रुपयांनी घसरून 62,063 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावात काही विशेष बदल झाले नाहीत हे भाव 23.99 डॉलर प्रति औंस आहेत.
न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या स्पॉट किमतीमध्ये आज किरकोळ घट झाली. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया आज मजबूत झाला आहे. आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 73.38 च्या पातळीवर उघडला त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये किंचित घसरण दिसून आली असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांसाठी हीच सोनं खरेदी करण्याची संधी आहे.