महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । शहरी भागात सध्या फार कमी पुजारी आहेत त्यामुळे गणेश चतुर्थीला पुजारी मिळणार नाहीत या भीतीने लोक आधापासूनच पुजारी ठरवून घेत आहेत. तर, सणांच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता गेल्यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे या वर्षी मंडळांची संख्या थोडी वाढली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली गणेशोत्सव मंडळं आणि घटलेली पुजाऱ्यांची संख्या यामुळे सप्टेंबर महिना सुरू होण्याआधीच पुजारी ठरवून घेतलं जात आहेत.
10 सप्टेंबरला तर, पुजाऱ्यांची डिमांड वाढणार आहे. आतातर, कोरोनामुळे काही पुजाऱ्यांनी घरुनच व्हीडिओ कॉलिंगच्या (Video Calling) माध्यमातून पूजाविधी सांगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही बुकिंग सुरू आहे.
युट्युबवर पाहा पूजाविधी
आता लोक टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. साध्यातल्या साध्या गोष्टींसाठी इंटनेटचा वापर करतो. तसाच वापर आता पुजाविधी पाहण्यासाठी युट्यूबचा केला जात आहे. त्यावर अगदी साहित्य, मंत्रोच्चार, पुजा पद्धतीही एका क्लिकवर माहिती मिळू शकते.
आजच्या काळात मोबाईल आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे आणि सर्च करणं सोपं झालं आहे. युट्यूबवर तर, रेसिपी, धार्मिक स्थळं, ज्योतिष शास्त्र सगळ्याचेचं व्हीडिओ मिळतात. तसच तिथे गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची स्थापना करण्याचा विधी सांगणारेही व्हीडिओ आहेत. शिवाय आरती, भजन, मंत्रोच्चारही युटयूबवर मिळतात.